पंतप्रधानांनी घेतला केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा घेतला. या आढाव्यात केदारनाथ येथे पायाभूत सुविधांना चालना देण्याचा समावेश होता, ज्यामुळे अधिक संख्येने भाविक आणि पर्यटक येतील.


पंतप्रधानांनी भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी अनुकूल सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला. सध्या सुरु असलेल्या केदारनाथ आणि परिसराच्या विकासकार्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास त्यांनी सांगितले.