मास्क न वापरणाऱ्या लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढल्याचा आय.सी.एम.आरचा दावा


मुंबई (वृत्तसंस्था) : मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था अर्थात, आय.सी.एम.आरनं केला आहे.

आय.सी.एम.आरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी वार्ताहरांना काल ही माहीती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ तरुण किंवा वृद्धांमार्फतच नव्हे, तर मास्क न वापरणाऱ्या तसंच शारीरिक अंतर नं राखणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे होत असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

सेरो सर्वेक्षण चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.