सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीची सीबीआयने केली सलग तिसऱ्या दिवशी चौकशीनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने आज सलग तिसऱ्या दिवशी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली. या चौकशीत अमली पदार्थ पुरवण्यासंदर्भात गोव्यामधला हॉटेल व्यावसायिक गौरव आर्य याचं नाव पुढे आलं होतं. त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय तसंच अंमली पदार्थ नियंत्रण कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे.  दरम्यान, सुशांतसिंग प्रकरणात भाजपाचा कसलाही संबंध नसून कोणालातरी वाचवण्यासाठी सीबीआय चौकशीला विरोध करणारे आता या प्रकरणावरून निष्कारण भाजपाचं नाव यात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.