ई-संजीवनी योजनेचा २३ राज्यांमधील लोकांना लाभ


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई–संजीवनी योजनेचा प्रसार करण्यात राज्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी राज्यांचे कौतुक केलं आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये ई–संजीवनी आणि ई-संजीवनी ओपीडी योजना २३ राज्यामध्ये सुरु करण्यात आली होती, आतापर्यंत ७५ टक्के नागरिकांना त्याचा लाभ मिळाला आहे.

डॉक्टर ते डॉक्टर आणि रुग्ण ते डॉक्टर यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परस्पर संवाद साधण्याची संधी देणारी ही योजना आहे. आतापर्यंत या माध्यमातून एक लाख पन्नास हजारांहून अधिक रुग्णांना ही सेवा मिळाली आहे. डिजिटल इंडिया अभियानाच्या माध्यमांतून ब्रॉडबंडआणि मोबाईल फोन्स द्वारे आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या सहकार्यामुळे वैद्यकीय तज्ञांना रुग्णांना उत्तमसेवा देणं शक्य होत आहे. कोविड-१९ च्या साथीतही या योजनेचा लाभ झाला आहे, असं डॉ. हर्ष वर्धन यांनी ईसंजीवनी योजनेच्या आढावा  बैठकीत सांगितलं.