कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १८ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १८ हजार ०५९ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४३३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच १८ कोटी १ लाख ३९ हजार ९०४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत
अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ७९ हजार ५४७ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३२४ (८८३ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०९ हजार ०१६
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
(मुंबईतील ५१ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५५, ठाणे शहर १२ व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना एसआरपीएफ १ अधिकारी, नवी मुंबई एसआरपीएफ १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी, ए.टी.एस. १,उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १,जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, सातारा१, अहमदनगर १,औरंगाबाद रेल्वे १,एसआरपीएफ अमरावती १)
कोरोना बाधित पोलीस – २१८पोलीस अधिकारी व १७१६ पोलीस कर्मचारी
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.