रेल्वेची वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेची मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर तसंच उपनगरी वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विशेष मेल तसंच एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक मात्र आता आहे, तशीच सुरु राहिल असं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे.