पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडापटूंना दिल्या शुभेच्छा; महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना वाहिली आदरांजली


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.


पंतप्रधान म्हणाले की, “राष्ट्रीय क्रीडादिन हा ज्या श्रेष्ठ क्रीडापटूंनी विविध खेळांमधे देशाचे प्रतिनिधीत्व करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि देशाची मान उंचावली आहे त्यांचे यश साजरे करण्यासाठी आहे. त्यांची चिकाटी आणि जिद्द उल्लेखनीय आहे.


आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण मेजर ध्यानचंद यानांही आदरांजली वाहू या, ज्यांच्या हॉकीस्टीकची जादू कधीच विसरता येणार नाही.


हा दिवस आपल्या क्रीडापटूंच्या कुटुंबियांचे, प्रशिक्षकांचे आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही कौतुक करण्याचा आहे, ज्यांनी या खेळाडूंना भक्कम पाठिंबा दिला आहे.


भारत सरकार खेळांची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि क्रीडापटूंच्या कौशल्याला वाव देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. तसेच या वेळेस मी आपणा सर्वांस खेळ आणि तंदुरुस्तीसाठी व्यायाम हा दैनंदीन जीवनाचा भाग बनविण्याचे आवाहन करतो. हे केल्याने अनेक लाभ मिळतात. सर्वजण आनंदी आणि निरोगी राहोत !”


 



Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image