पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या प्रमाणात आणि किरकोळ विपणनासाठी अधिकृत मान्यता देण्याच्या मार्गदर्शक सूचना सुलभ केल्या
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली : पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने 8 नोव्हेंबर 2019 च्या ठरावानुसार मोटर स्पिरिट (पेट्रोल) आणि हाय स्पीड डिझेल (डिझेल) च्या मोठ्या प्रमाणात आणि किरकोळ विपणनासाठी अधिकृत मान्यता देण्याच्या मार्गदर्शक सूचना सुलभ केल्या आहेत. एमएस अर्थात मोटर स्पिरिट आणि एचएसडी अर्थात हाय स्पीड डिझेल विपणनात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे हा मार्गदर्शक सूचना सुलभ करण्यामागचा उद्देश आहे. किरकोळ किंवा घाऊक विपनणाचे अधिकार प्राप्त करू इच्छिणाऱ्या कंपन्यांकडे किमान 250 कोटी तर किरकोळ आणि घाऊक दोन्ही विपनणाचे अधिकार प्राप्त करू इच्छिणाऱ्या कंपन्यांकडे किमान 500 कोटी रुपयांचे मूल्य अर्ज करतेवेळी उपलब्ध असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात अर्ज थेट मंत्रालयात सादर करता येतील.
किरकोळ विपणनासाठीचे अधिकार प्राप्त करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना कमीतकमी 100 किरकोळ दुकाने उभारणे आवश्यक आहे. मंत्रालयाकडून, पेट्रोलियम पदार्थांच्या विपणननासाठी आधी लागू असलेल्या कठोर धोरणांच्या तरतुदींमध्ये शिथिलता आणण्यात आली असून हे क्षेत्र विपणनासाठी खुले करण्यात आले आहे. देशातील इंधन वाहतूकीच्या विपणन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आणण्याची क्षमता या धोरणामध्ये आहे.
काही शंका असल्यास कृपया पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या या क्रमांकावर संपर्क साधा : +91-11-2338 6119/6071 (सोमवार ते शुक्रवार - कार्यालयीन वेळेत)
पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या प्रमाणात आणि किरकोळ विपणनासाठी अधिकार प्राप्त करून देण्याच्या ठरावामुळे पेट्रोल-डिझेल विपणन क्षेत्रात खासगी क्षेत्रासोबतच परदेशी कंपन्यांची देखील भागीदारी वाढण्यास मदत होईल. यामुळे पर्यायी इंधन वितरित करण्यास आणि दुर्गम भागात किरकोळ नेटवर्कच्या वाढीला प्रोत्साहित करेल आणि ग्राहक सेवा सुधारण्यास मदत करेल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.