73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर ऑनलाईन चित्रपट मोफत


नवी दिल्ली : 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय माहीती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आजपासून २१ ऑगष्ट पर्यंत देशभक्तीपर चित्रपट मोफत ऑनलाईन दाखवले जाणार आहेत.

  यात गांधी चित्रपटाचाही समावेश आहे, अशी माहीती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.  www.cinemasofindia.com या संकेतस्थळावर चित्रपट रसिक या चित्रपटांचा आनंद लुटू शकतात.