पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले


विभागात कोरोना बाधित 1 लाख 5 हजार 973 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे : पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 973 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 661 आहे. कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. तसेच 1 हजार 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.83 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील 84 हजार 765 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 54 हजार 128 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 656 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार 122, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 983, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 78, पुणे कॅन्टोंन्मेंट 137, खडकी विभागातील 30, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 306 रुग्णांचा समावेश आहे.


पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 981 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 337, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 361, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 62, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 41, ग्रामीण क्षेत्रातील 149 रुग्णांचा समावेश आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे. उर्वरित 808 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.86 टक्के आहे.


सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 849 रुग्ण असून 2 हजार 36 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 683 आहे. कोरोनाबाधित एकूण 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील 8 हजार 637 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 956 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 189 आहे. कोरोना बाधित एकूण 492 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 2 हजार 452 रुग्ण असून 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 769 आहे. कोरोना बाधित एकूण 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील 6 हजार 270 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 736 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 364 आहे. कोरोना बाधित एकूण 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ


कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 34 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 94, सातारा जिल्ह्यात 188, सोलापूर जिल्ह्यात 250, सांगली जिल्ह्यात 283 तर कोल्हापूर जिल्ह्यात 219 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 15 हजार 20 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 5 हजार 973 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.


( टिप :- दि. 31 जुलै 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image