स्थानिक तसेच जागतिक स्तरावरील रोजगारसंधी कौशल्य भारत मोहिमेमुळे वाढतील: पंतप्रधानजागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी युवावर्गाला कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्यवृद्धीसाठी दिले प्रोत्साहन

कुशल कामगार तसेच रोजगार देणारे यांची सांगड घालणारी वेबसाईट नुकतीच लॉन्च झाली, कुशल कामगारांसोबत घरी परतलेल्या स्थलांतरीत कामगारांनाही रोजगार शोधण्यास ती उपयुक्त ठरेल, पंतप्रधानांचे प्रतिपादन

देशातील कौशल्यसंधीला जागतिक मागणीसाठी पुरवठा म्हणून अमाप संधीनवी दिल्ली : जागतिक युवा कौशल्य दिन आणि कौशल्य भारत मिशनच्या आरंभाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आज भरलेल्या डिजिटल कौशल्य परिषदेला पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशात युवकांना सतत बदलत्या व्यावसायिक वातावरणात आणि बाजारव्यवस्थेत तग धरून राहण्यासाठी  कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्यवृद्धी या गोष्टी  हस्तगत करण्यासाठी प्रोत्साहन केले.  त्यांनी युवावर्गाचे या प्रसंगी अभिनंदन केले आणि काळासोबत राहण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणाऱ्या युवकांच्या मुठीत विश्व असेल असा संदेश दिला.


याच दिवशी पाच वर्षांपूर्वी कौशल्य भारत अभियानाला प्रारंभ झाला. या अभियानाने कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्यवृद्धी  यासाठी मोठे जाळे उभारण्यात आल्याचे आणि त्यामुळे स्थानिक व जागतिक पातळीवरही रोजगारसंधी उपलब्ध झाल्याचे सांगीतले. यामुळे देशभरात  शेकडो  पीएम कौशल्य केंद्रे उभारण्यात आली व ITI ची क्षमताही वाढवण्यात आल्याचे सांगितले. या नियोजित प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षात पाच कोटींहून जास्त युवकांनी कौशल्ये हस्तगत केल्याचे त्यांनी सांगितले. कुशल कामगार तसेच रोजगार देणारे यांची सांगड घालणारी वेबसाईट नुकतीच लॉन्च झाली त्याचा उल्लेख करून ती कुशल कामगारांसोबत घरी परतलेल्या स्थलांतरीत कामगारांनाही उपयुक्त ठरेल आणि  एका क्लिकवर कुशल कामगार उपलब्ध होतील जे व्यावसायिकांनाही उपयुक्त असेल असे म्हटले आहे. स्थलांतरीत कामगारांकडील कौशल्यांच्या मदतीने त्यांना स्थानिक अर्थकारण बदलता येईल असे सांगितले.


कौशल्य हे एखाद्या उपहारासारखे आहे जे आपण आपल्याला बहाल करु शकतो असे सांगत त्यांनी कौशल्ये ही कालातीत, एकमेवाद्वितिय आणि खजिन्यासारखा असतात. त्यांच्या सहाय्याने एखाद्याला फक्त रोजगारच नाही तर समाधानी जीवनाची गुरुकिल्ली मिळते. नवनवी कौशल्ये हस्तगत करण्याकडे माणसाचा नैसर्गीकरित्या कल असतो व त्यामुळे नवा उत्साह आणि जगण्यासाठी प्रोत्साहन मिळते. कौशल्यप्राप्ती म्हणजे फक्त रोजगाराचे साधन नसून दैनंदिन जीवनात उत्साही आणि आनंदी राहण्याचेही ते एक साधन आहे, असे ते म्हणाले.


माहिती आणि कौशल्य यातील फरक पंतप्रधानांनी  स्पष्ट केला. त्यासाठी एक उदाहरण देत त्यांनी हे स्पष्ट केले, सायकल कशी चालते ते माहित असणे म्हणजे प्रत्यक्षात सायकल चालवता येणे म्हणजे कौशल्य. या दोन्हीतला फरक, त्यांचे वेगवेगळे उपयोग आणि योग्य ठिकाणी उपयोजन हे युवा वर्गाला समजणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. सुतारकामाचा संदर्भ देत त्यांनी कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्यवृद्धी यातील बारकावे सांगितले.


देशात उपलब्ध असलेल्या कौशल्यसंधी आणि त्याचा योग्य वापर हेच देशाचे सामर्थ्य असल्याचे अधोरेखित केले. आरोग्य क्षेत्राचा उल्लेख करत ते म्हणाले की भारतीय कुशल मनुष्यबळ जागतिक मागणी पुरी करू शकते या मागणीची शास्त्रशुद्ध मांडणी करून भारतातील प्रमाण व इतर देशातील प्रमाण यांची सांगड घालण्याची गरज व्यक्त केली. याच बरोबर त्यांनी सूचना केली की मोठी समुद्र परंपरा असलेले भारतीय तरुण जगभर फिरणाऱ्या व्यापारी जहाजांवर खलाशी म्हणून आपले योगदान देऊ शकतील.


जागतिक युवक कौशल्य दिन हा दरवर्षी 15 जुलैला साजरा केला जातो यावर्षी तो व्हर्चुअल  माध्यमातून साजरा करण्यात आला


कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्री डॉ. महेन्द्रनाथ पांडे, कौशल्यविकास आणि नवउद्योजकता राज्यमंत्री  आर के सिंग, लार्सन आणि टुब्रोचे समूह संचालक ए. एम नाईक यांनी परिषदेला संबोधित केले. याशिवाय सर्व संबधीत, शिकणारे उमेदवार लाखोंच्या संख्येने या परिषदेत, सहभागी झाले होते.