केसांच्या देखभालीसाठी ओरिफ्लेमद्वारे 'हेअरएक्स' सादर


सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत करते केसांचे संरक्षण


मुंबई : हवामानातील तीव्र बदल उदा. अतिनील किरणे, आर्द्रता, थंड तापमान, कोरडी हवा यामुळे केस कमकुवत, चिपचिपीत आणि विंचरण्यास कठीण होऊन बसतात. या समस्येवर मात करण्यासाठी तसेच तुम्हाला निरोगी, सुंदर, व्यवस्थित केस प्रदान करण्यासाठी ओरिफ्लेम या थेट विक्री करणाऱ्या स्वीडिश सौंदर्य ब्रँडने हेअर अॅडव्हान्स्ड केअर वेदर रेसिस्ट रेंज बाजारात आणली आहे.


सर्व हवामान स्थितीत केसांना संरक्षण देण्यासाठी उच्च क्षमतेचा शाम्पूस कंडिशनर आणि अॅम्प्लीफायर ही उत्पादनाची श्रेणी तयार करण्यात आली आहे. शाम्पूद्वारे केस सौम्यपणे स्वच्छ होतात, ते चिकट राहत नाहीत तसेच सुटे होतात. कंडिशनर वापरल्याने केस मऊ, मुलायम आणि चमकदान बनतात. अखेरीस अगदी कमी वजनाचे अॅम्प्लीफायर वापरल्याने केसांचा आर्द्रतेपासून बचाव होतात. तसेच ते रेशमी आणि चमकदार बनतात.


अत्याधुनिक वेदर शील्ड तंत्रज्ञानाद्वारे निर्माण केलेल्या नव्याने लाँच झालेल्या या उत्पादनांमध्ये युएव्ही/युव्हीबी किरणांविरुद्ध लढणारे युव्ही फिल्टर्स आणि फ्री रॅडिकल्सपासून केसांना संरक्षण देणारे युव्ही फिल्टर्स आहेत. आर्द्रतेमुळे आलेला चिकटपणा नियंत्रित ठेवतानाच कोरड्या हवेमुळे आलेल्या निस्तेज केसांना मुलायम करण्यासाठी या उत्पादनामध्ये एक विशेष कवच आहे, जे केसाच्या प्रत्येक भागाचे संरक्षण करते. अशा प्रकारे, सगळ्याच तीव्र वातावरणात ही उत्पादने केसांना ७२ तासांचे संरक्षण देते आणि दिवसागणिक सुंदर केसांचा आत्मविश्वासही प्रदान करते.