संसदेचं पावसाळी अधिवेशन भरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन भरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितींच्या बैठका आयोजित करण्यावर अनेकवेळा चर्चा केली आहे.

दरम्यान कोविड-19 साथीच्या विविध पैलूंबाबत आवश्यक माहिती, विश्लेषण आणि दृष्टिकोन लोकांमध्ये विकसित करण्यात माध्यमांनी निभावलेल्या भूमिकेचं नायडू यांनी कौतुक केलं आहे. तथापि काही दूरचित्रवाणी वाहिन्यांमधून अतिरंजित बातम्या प्रसारित होण्याबाबत नायडू यांनी दक्षतेचा इशारा दिला आहे.