एंजल ब्रोकिंग बनले देशातील ४ थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊस


मार्च २०२० पासून दरमहा सरासरी १ लाख नव्या ग्राहकांना जोडत आहे


मुंबई : भारतीय ब्रोकिंग क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारी एंजल ब्रोकिंग एनएसईवरील सक्रिय ग्राहकांवर आधारीत क्रमवारील देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म बनली आहे. नव्या युगातील या ब्रोकरेज फर्मने मिळवलेल्या या यशामागे टेक्नो सॅव्ही आणि डिजिटल व्यवहार करण्यासाठी डीआयवाय मार्गांना प्राधान्य देणारे मिलेनियल ग्राहक आहेत. मागील एकाच वर्षात ब्रोकरेज फर्मने अनेक पुरस्कार मिळ‌वले. मार्च २०२० पासून हा प्लॅटफॉर्म सरासरी १ लाख नव्या ग्राहकांना जोडत आहे.


एंजल ब्रोकिंगची ही तेजस्वी कामगिरी म्हणजे फर्मचे संपूर्ण डिजिटल परिवर्तन आणि अभिनव दृष्टीकोन यांचा परिणाम आहे. सुरुवात करणा-यांसाठी, एंजल ब्रोकिंगसोबत खाते उघडण्यासाठी तसेच ट्रेडिंग सुरू करण्यासाठी (केवायसीचे पालन करणारे ग्राहक ) १५ मिनिटांपेक्षाही कमी कालावधी लागतो. प्लॅटफॉर्म मोफत इक्विटी डिलिव्हरी ट्रेडसह इंट्रा डे, एफ अँड ओ ट्रेड, कमोडिटी आणि चलन यासाठी फक्त २० रुपये शुल्क आकारले. यात आणखी भर म्हणजे, भारतभरातील मिलेनिअल पिढीनुसार, एंजल ब्रोकिंगचा नावीन्यपूर्ण मार्केटिंग अॅप्रोच आहे.


भविष्याचा वेध घेणा-या या ब्रोकरेज फर्मने प्लॅटफॉर्मवर ‘अँप्लिफायर्स’ नावाची वैशिष्ट्यपूर्ण सुविधा दिली आहे. याद्वारे ती या उद्योगातील गेम चेंजर ठरत आहे. ही भारतीय इन्फ्लुएंसर्सना ब्रोकरेज फर्मसोबत थेट भागीदारी करण्यास सक्षम करते. शेवटच्या ग्राहकांपर्यंत संदेेश पोहोचावा, हा मोहिमेमागील हेतू आहे. एंजल ब्रोकिंग कंटेंट कोलॅबरेटर्सना पॉडकास्ट, वेबिनार्स, ट्रेनिंग सेशन्स इत्यादीच्या माध्यमातून चांगले शिकण्याची संधी प्रदान करते.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “ एंजल ब्रोकिंगमध्ये आमच्या ग्राहकांसाठी युनिक आणि सार्थकी अनुभव निर्माण करणे, यावर आमचा सतत भर असतो. आमच्या शक्तीशाली, परंतु वापरण्यास सोप्या अशा प्लॅटफऑर्मवर अखंड, डेटा आधारीत गुंतवणुकीचा अनुभव मिळतो. तसेच आम्ही इक्विटी गुंतवणूक अश्विसनीय बनवण्यासाठी सतत नव्या कल्पनेच्या मोडमध्ये असतो. वृद्धीतील नवा मैलाचा दगड गाठल्याबद्दल आम्हाला अअभिमान आहे. एंजल ब्रोकिंग या ब्रँडवर विश्वास ठेवल्याबद्दल आमचे सर्व व्यापारी/ गुंतवणूकदार आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो.”


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीईओ श्री विनय अग्रवाल म्हणाले, “स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी मिलेनियल्सची पहिली पसंती होण्याकरिता आम्ही एक पारंपरिक ब्रोकरेज फर्मच्या संकल्पनेपासून मोठी झेप घेतली आहे. मार्च २०२० पासून आम्ही दरमहा सरासरी १ लाख नवीन खाती जोडली आहेत. नजीकच्या भविष्यात रिटेल स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रात बाजाराचे नेतृत्व करण्यासाठी हा वृद्धी दर असाच गतिमान ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ”