नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतावर असे कित्येक संकटे आली आणि गेलीत परंतु भारताने न डगमगता यशस्वीपणे त्या संकटाचा सामना करत यशाचा मार्ग खेचून आणला आहे. हा भारताचा इतिहास आहे त्यामुळे वर्तमान करोना संकटाला न भीता तसेच सध्याची जी संकटांची मालिका चालू आहे त्या लक्षात घेऊन या अनलॉकडाऊन च्या काळात ‘दो गज कि दुरी’ म्हणजेच सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे आणि शक्यतो घराबाहेर न पडणे, हे नियम पळून सामूहिकरीत्या या साथीचा मुकाबला करू या. पंतप्रधान पुढे म्हणाले की, या संकटांमधूनही भारत अधिकच भव्य आणि सक्षम होत बाहेर पडेल. त्यांनी यावेळी शाश्वत , सृजनशील अशा कवितेच्या ओळी म्हटल्या -.
यह कल-कल छल-छल बहती, क्या कहती गंगा धारा ?
युग-युग से बहता आता, यह पुण्य प्रवाह हमारा I
क्या उसको रोक सकेंगे, मिटनेवाले मिट जाएं,
कंकड़-पत्थर की हस्ती, क्या बाधा बनकर आए I
पुढे म्हणाले की भारतातही, जिथे एका बाजूला मोठमोठी संकटे येत गेली, त्याचवेळी सर्व अडचणींना दूर करत अनेक गोष्टींची निर्मिती देखील झाली. या संकट काळातच नवीन साहित्य निर्मिती, नवे शोध लागत नवे सिद्धांत मांडले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ,आपल्या वीर जवानांनी दाखवून दिले आहे की ते कधीही भारतमातेच्या सन्मानाला कुठलीही झळ पोहचू देणार नाहीत. वीरगती प्राप्त झालेल्या मातापित्यांनी त्यांच्या नातवांना मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्यात भरती करण्याच्या निर्णयाचे ांनी स्वागत केले.