बाळाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली एक लाख रुपयांची मदत


नवी मुंबई : घणसोली इथं राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या बाळाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एक लाख रुपयांची मदत दिली. अन्सारी यांच्या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज आणि एक छिद्र होतं. ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाच्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात घेऊन आल्यावर त्यांच्यासमोर शस्त्रक्रियेसाठी पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न उभा राहिला. समाज माध्यमाद्वारे त्यांनी आपली अडचण मांडली.

आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ती पोहोचताच त्यांनी लगेचच युवा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत याबाबत माहिती घेऊन अन्सारी यांना ही  मदत केली. अधिक मदत लागली तर ती देण्याचीही तयारी त्यांनी  दर्शवली आहे. सध्या या बाळावर उपचार सुरू असून अब्दुल अन्सारी यांनी आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.


Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image