महाराष्ट्र शासन रोखे २०२० ची परतफेड येत्या २१ जुलै रोजी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : महाराष्ट्र शासनाने सन 2010 मध्ये काढलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज 2020 अंतर्गत कर्जरोख्यांची मुदत पूर्ण होत असून कर्जरोख्यांच्या अदत्त शिल्लक रक्कमेची परतफेड येत्या 21 जुलै 2020 रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
पराक्राम्य संलेख अधिनियम , 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने 21 जुलै, 2020 रोजी सुटी जाहीर केल्यास राज्यातील अधिदान कार्यालय कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि.21 जुलै 2020 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही .
सरकारी प्रतिभुती विनियम,2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) नुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत रोखेधारकाच्या बँकखात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मुळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदनी करण्यात आली आल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बॅक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.
तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या / इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परफेड करणे सुलभ व्हावे यासाठी 8.15 टक्के व्याजदराचे महाराष्ट्र शासन रोखे, 2020च्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ‘प्रमाणपत्रावरील देय मुदलाची रक्कम मिळाली’ असे नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.
भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बॅकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास ते संबंधित बॅकेच्या शाखेत सादर करावेत. ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत.
रोख्याची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी रक्कम स्वीकारायची असल्यास त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात /उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.