सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन दरम्यान लष्करी चर्चा सुरू


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सध्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग या चर्चेचे नेतृत्व करत आहेत. चीनकडून मेजर जनरल लिन लुई यामधे सहभागी झाले आहेत.