निवृत्तीवेतन वेळेवर मिळण्यासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अपडेटेशनचे काम करण्यात येत असून निवृत्ती वेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे.
अधिदान व लेखा कार्यालयामार्फत माजी विधानसभा/विधानपरिषद सदस्य, माजी आयएएस/आयपीएस अधिकारी तसेच राज्य शासनाचे निवृत्त अधिकारी/कर्मचारी (70 हजार) यांना दरमहा निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाते.
निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे नाव, निवृत्तीवेतन धारकाचा पीपीओ क्रमांक, जन्मतारीख, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, ईमेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, सध्याचा पत्ता अशी आठ मुद्द्यांवरील माहिती पाठविणे अपेक्षित आहे. मुंबई शहरातील निवृत्ती वेतन धारकांनी आपली माहिती 10 जून ते 30 जून 2020 पर्यंत तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांनी 1 जुलै ते 30 जुलैपर्यंत paopension1@gmail.com या ईमेलवर अथवा लेखा कोष भवन, ए विंग, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई- 400051 या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.