नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आसाममधल्या हैलाकांडी जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजायच्या सुमाराला दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ मुलांसह ७ जण मृत्युमुखी पडले, तर २ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
सरकारी अधिका-यानं ही माहिती दिली. जखमींना रूग्णालयात जाखल केलं आहे. या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख द्यायचे आदेश आसामचे मंत्री परिमल सुक्लवैद्य यांनी दिले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.