देशाचे सर्वात वयोवृद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं मुंबईत निधन


नवी दिल्ली : देशाचे सर्वात वयोवृद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते १०० वर्षांचे होते.

उजव्या हाताने फलंदाजी करणारे रायजी यांनी १९४० मधे ९ प्रथम श्रेणी सामन्यांत एकूण २७७ धावा केल्या होत्या. विजय मर्चंट यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट क्लब ऑफ इंडीयाच्या संघातून ते खेळले होते. व्यवसायाने सनदी लेखापाल असलेल्या रायजींचा क्रिकेट इतिहासाचा अभ्यास होता.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image