नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत बांद्रा टर्मिनसवरुन आज श्रमिक विशेष रेल्वेगाडी सुटण्याआधी बांद्रा टर्मिनसकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो मजुरांची गर्दी लोटल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. या स्थानकावरुन बिहारमधे पूर्णिया इथं जाणारी गाडी आज दुपारी २ वाजता सोडण्याची घोषणा रेल्वेनं केली होती.
आज सकाळी ११ च्या सुमाराला त्या भागात गर्दी होऊ लागली. नोंदणी केलेल्या १ हजार ७०० कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना घेऊन ही गाडी वेळेवर सुटली. मात्र नोंदणी न केलेले अनेकजण रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावर तसंच पुलावर जमा झाले होते. त्यांना नंतर पोलिसांनी पांगवल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.