हरित हायड्रोजनचा वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यासंबंधी केंद्राच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वाहतूक क्षेत्रामध्ये हरित हायड्रोजनचा वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारनं जारी केल्या आहेत. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रोलायझर्सच्या किंमती कमी होत असल्यामुळे, हरित हायड्रोजनवर आधारित वाहनांच्या किंमती पुढील काही वर्षांमध्ये कमी होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनखाली, इतर पुढाकारांसोबतच, मंत्रालय हरित हायड्रोजन आणि त्याचे उपपदार्थ यांच्याद्वारे वाहतूक क्षेत्रातील जीवाश्म इंधनं बदलण्यासाठी पथदर्शी प्रकल्प लागू करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत आणि योजनेखाली सूचित अंमलबजावणी संस्थांद्वारे हे प्रकल्प राबवले जाणार आहेत. बसगाडी, ट्रक्स आणि चार चाकी वाहनांमध्ये हरित हायड्रोजनच्या वापरासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास योजनेच्या अंतर्गत आधार दिला जाईल. हायड्रोजन पुनर्भरण स्थानकांसारखी पायाभूत सुविधा विकसित करणं देखील योजनेत समाविष्ट आहे.

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image