इस्रोकडून आज हवामान अभ्यास विषयक उपग्रहाचं प्रक्षेपण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्रो आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्हीच्या माध्यमातून आपल्या हवामान विषयक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. 'नॉटी बॉय' या टोपणनावाने संबोधल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हे प्रक्षेपण होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी प्रक्षेपण होईल अशी माहिती इसरोनं दिली आहे. भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनच्या मदतीने बनवलेल्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून होत असलेलं हे १६ वं प्रक्षेपण आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग आणि समुद्रांत घडणाऱ्या हवामानाविषयक बदलांचा अभ्यास या मोहिमेद्वारे केला जाणार आहे. या प्रक्षेपणाची होत असलेली २७ तासांची उलटगणती सुरळीत सुरु असल्याची माहिती इसरोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हवामानाविषयक अंदाजाबरोबरच संभाव्य आपत्तीचा इशारा मिळायला या मोहिमेमुळे मदत होणार आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image