रुग्ण किंवा नातेवाईकाच्या परवानगी शिवाय ICU मध्ये दाखल न करण्याची आरोग्य मंत्रालयाची रुग्णालयांना सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रुग्णाच्या नातेवाईकांनी अथवा स्वतः रुग्णानं नकार दिला तर रुग्णालय रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करू शकणार नाहीत. गंभीर आजारी रूग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याविषयी आरोग्य मंत्रालयानं रुग्णालयांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या सूचना दिल्या आहेत.

एखाद्या आजारावरच्या उपचारांना मर्यादा असेल, साथीचे रोग आणि आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय उपचार आणि सामुग्री मर्यादित असेल तर अशावेळी रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करता येणार नाही असं या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटलं आहे.

एखाद्या गंभीर रुग्णावर उपचार उपलब्ध नसतील आणि रूग्णाच्या जीविताविषयी खात्री देता येत नसेल, तर त्याला अतिदक्षता विभागात दाखल करणं व्यर्थ असल्याचं यात म्हटलं आहे.