रुग्णासाठी रक्त घेताना रक्तपेढ्या किंवा रुग्णालय प्रक्रीया शुल्काशिवाय इतर कोणतेही शुल्क आकारू शकणार नाही - CDSCO

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुग्णासाठी रक्त घेताना रक्तपेढ्या किंवा रुग्णालय प्रक्रीया शुल्काशिवाय इतर कोणतेही शुल्क आकारू शकणार नाही. CDSCO अर्थात केंद्रीय औषध दर्जा नियंत्रक संघटनेनं हे आदेश जारी केले आहेत. यामुळे रक्त पुरवठ्यासाठी होणारी अतिरीक्त शुल्क आकारणी बंद होणार आहे. यासंदर्भातले दिशानिर्देश यापूर्वीही जारी केले होते. त्यांचं पालन व्हावं यासाठी CDSCO नं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा हे आदेश दिले आहेत.