इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. 

यंदा या परीक्षेसाठी झालेल्या, विद्यार्थी नोंदणीतून, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचं आढळून आलं  आहे. त्यामुळे यंदा अचानक विद्यार्थिसंख्या का वाढली, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.