राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं. उत्तर प्रदेशला सुवर्ण तर गुजरातला रौप्य पदक मिळालं. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमामुळं पर्यटनाला चालना मिळेल, असं जयशंकर यावेळी म्हणाले.