'देश प्रथम' या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा १०८ वा भाग होता. कोणतंही काम करताना त्यातून देशाचं हित कसं साधलं जाईल याचा विचार करायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं.