भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेत प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली असून २०४७ पर्यंतचा काळ हा अमृत काळ आहे.

हा काळ नित्य नवी उद्दिष्ट्य गाठण्याचा आहे, असं मोदी म्हणाले. आम्ही सहयोगानं लक्ष्य निश्चित करु शकतो, आणि ते पूर्ण करु शकतो, हा विश्वास भारतानं जगाला दिला आहे. जग अनेक अनिश्चिततांच्या काळातून जात असताना भारत एक आशेचा किरण म्हणून पुढं आला आहे, असं ते म्हणाले.

संयुक्त अऱब अमिरातीचे अध्यक्ष महंम्मद बिन झायेद अल नह्यान, मोझाबिंक चे अध्यक्ष फिलिप न्यूसी आणि तिमोरचे लेस्टचं अध्यक्ष खोसे रामोस होर्ता, झेक रिपब्लिकचे प्रधानमंत्री पिटर फियाला, केंद्रिय मंत्री पियूष गोयल तसंच, उद्योग आणि व्यापार क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यावेळी उपस्थित होते.

२०४७ पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र करण्याचं लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीनं गुजरात हे विकासाचं इंजिन होणार असून, ही परिषद अमृतकाळाचा मार्गदर्शक नकाशा तयार करेल, असं ते म्हणाले. ३४ भागीदार देश, आणि १६ भागीदार संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत.