महिला क्रिकेटमधे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडीयमवर झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने उभारलेल्या ४२८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १३६  धावा करु शकला होता. दुसरा डाव ६ गडी बाद १८६ धावसंख्येवर भारताने घोषित केल्यावर आज इंग्लंडने खेळायला सुरुवात केली. मात्र १३१ धावांवर त्यांचा डाव आटोपला. दीप्ती शर्माने पहिल्या डावात अवघ्या ७ धावा देत ५ खेळाडू बाद केले तर दुसऱ्या डावातही ४ बळी घेतले.