भूतानचे राजे जिगमे खेसर नामग्याल वांगचुक यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भूतानचे राजे जिगमे खेसर नामग्याल वांगचुक यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत भारत-भूतान संबंधांबद्दल खूप सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली. भूतानचा विकास आणि तिथल्या नागरिकांच्या कल्याणाबद्दल भूतानच्या राजांच्या दृष्टिकोनाचा आपल्याला फार आदर आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. भूतानचे राजे सध्या आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते महाराष्ट्रालाही भेट देणार आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image