भारतीय ग्राहकांकडून आता उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची मागणी : पीयूष गोयल

 

भारत मंडपम येथे ‘जी 20 मानके संवाद’ मध्ये  केंद्रीय मंत्री  गोयल सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय ग्राहक आता उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची मागणी करत आहेत आणि त्याच्या पूर्ततेसाठी  सरकार उत्पादकांना नवीन गुणवत्ता मानकांशी जुळवून घेण्यासाठी मदत आणि वाजवी वेळ देत आहे तसेच  भारताला चांगल्या दर्जाच्या उत्पादनांचा प्रदाता म्हणून ओळखले जाईल हे सुनिश्चित केले जात आहे, असे  केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे

ते आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित  'जी 20 मानके  संवाद' च्या समारोपाच्या सत्रात बोलत होते.

जागतिक स्तरावर स्वीकारल्या जाणार्‍या मानकांचा अवलंब करण्यासाठी भारताला मदत करण्याच्या दृष्टीने  आंतरराष्ट्रीय संस्थांसह मानकांचे सामंजस्य सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे, असे गोयल म्हणाले. भारताने प्रत्येक गोष्टीच्या दुहेरी   मानकांच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.भारतात तयार होणारे प्रत्येक उत्पादन हे उच्च दर्जाचे उत्पादन असेल, असा आपला प्रयत्न असला पाहिजे , असे   गोयल म्हणाले.

जर ग्राहक भारतातील एखादे उत्पादन खरेदी करतात  तर त्यांना उच्च दर्जाची खात्री दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  विकसित राष्ट्रांना या संदर्भात खूप काही अनुभव सांगायचे आहेत आणि आणि म्हणूनच, ज्या देशांना त्याची गरज आहे त्यांच्यासाठी जी 20 मानक संवादासारख्या नियमित सहभागातून एक भक्कम चौकट  तयार केली पाहिजे, असे ते म्हणाले.

आगामी काही वर्षांमध्ये भारत चाचणी प्रयोगशाळांप्रमाणे आपल्या मानक व्यवस्थेमध्ये  सुधारणा करेल आणि   इतर देशांसोबत परस्पर मान्यतेचे  करार केले जातील जेणेकरून धरणी  माता आणि जगातील प्रत्येक नागरिकाच्या चांगल्या आणि समृद्ध भविष्यासाठी गुणवत्ता असणाऱ्या वस्तू  प्राप्त होतील , अशी आशा आहे, असे गोयल यांनी सांगितले.