डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय, शिफारशी पाठविण्याचे आवाहन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या लोकाभिमुख योजना, निर्णय, ध्येय-धोरणे, इत्यादींची माहिती विविध डिजिटल माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला आहे.
डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Digital_Advertising_Guidelines_03_11_23.pdf या लिंकवर हा प्राथमिक मसुदा उपलब्ध आहे. या मसुद्याबाबत अभिप्राय, सूचना आणि शिफारशी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत dgiprsocialmedia@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.