पुण्यामधे मित्रशक्ती-२०२३ या संयुक्त लष्करी सरावाची सांगता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत श्रीलंका मित्रशक्ती-२०२३ या संयुक्त लष्करी सरावाची सांगता काल महाराष्ट्रात पुणे इथं झाली. संयुक्त राष्ट्रांकडून ठरवून देण्यात आलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांसाठी तसंच युद्धक्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं या सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील औंध लष्करी तळावर झालेल्या या सरावात भारताचे १२०, तर श्रीलंकेचे ५३ जवान सहभागी झाले होते. यावेळी भारतीय लष्करातर्फे ब्रिगेडियर एस तलुजा, तर श्रीलंकेच्या लष्करातर्फे मेजर जनरल रथानायका उपस्थित होते.