उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्थांचं संरक्षणमंत्र्यांनी केलं कौतुक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या योगदानाबद्दल कौतुक केलं आहे. एन डी आर एफ ,एस डी आर एफ, उत्तराखंड पोलीस आणि सशस्त्र दलाच्या अफाट कार्याचं त्यांनी कौतुक केलं.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी या बचावकार्याची माहिती घेतली, मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी वारंवार भेटी देऊन योग्य ती पाहणी केली, याबद्दल राजनाथ सिंग यांनी त्यांची  प्रशंसा केली . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जनरल व्ही के सिंग यांच्या योगदानाचं  राजनाथ सिंग यांनी कौतुक केलं.