कृषी उत्पादनांची निर्यात वाढवून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची केंद्रीय सहकार मंत्र्यांची ग्वाही

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड हे सरकारनं विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल असल्याचं केंद्रिय सहकार आणि गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सहकारी निर्यात या विषयावरच्या राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन करताना बोलत होते.कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी तसंच त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२७ पर्यंत देशातले २ कोटींहून अधिक शेतकरी हे सेंद्रिय शेतीबरोबर असतील असंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड चं बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपुस्तिकेचं प्रकाशनही शाह यांनी केलं.देशाचं सहकार क्षेत्र मजबूत करणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image