गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडस्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यात सध्या सुरु असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत बॅडमिंटन, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक आणि नेटबॉलच्या स्पर्धा पार पडल्या. आंध्रप्रदेशच्या गौस शेख आणि पूजा डी यांनी बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळवलं तर पुरुष एकेरीतलं सुवर्णपदक तेलंगणच्या थरुन मनेपल्ली याला मिळालं. पुरुष दुहेरीचं सुवर्णपदक कर्नाटकच्या बॅडमिंटनपटूंनी पटकावलं.