आदित्य एल वन या अंतराळयानाकडून पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सूर्याचा अभ्यास करणाऱ्या देशाच्या पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत प्रक्षेपित आदित्य एल १ अंतराळयानानं आज पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन केलं आहे. कक्षा परिवर्तन करताना या अंतराळयानाला बंगळुरू, मॉरिशस, पोर्ट ब्लेअर इथल्या केंद्रांनी ट्रॅक केल्याची माहिती इसरोनं एक्स या समाज मध्यमावरून दिली आहे. येत्या मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास हे अंतराळयान या पुढच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.