डॉ. भारती पवार यांची पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केरळातल्या कोझिकोडेइथल्या निपाह बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांच्या १५ पैकी ११ जणांना निपाहची बाधा झाली नसल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. निपाह विषाणू निरीक्षणांतर्गत काल २३४ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. आजवर ९५० व्यक्तींचा संपर्क यादीत समावेश करण्यात आला असून यामध्ये २८७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी २१३ जण अति जोखीम श्रेणीत आहेत, असं आरोग्य विभागानं जाहीर केलं आहे. दरम्यान, मृत डुकरांचं किंवा वटवाघळांचं शव कोणीही हाताळू नये अशी सूचना आरोग्य विभागानं दिली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काल पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट दिली. निपाह विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. या संस्थेचं उच्चस्तरीय पथकं सुसज्ज फिरत्या प्रयोगशाळांसह कोझिकोडेमध्ये दाखल झालं  असून त्यांनी चाचण्या करण्याचं काम सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image