वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना वकिलांनी समजावून सांगितलं वाहतूक नियमांचं महत्व

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर शहरातल्या हुतात्मा चौक इथं आज महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि पालघर विधी सेवा समिती तर्फे रोड ट्रॅफिक रुल्स या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सीटबेल्ट न लावणं, हेल्मेटचां वापर करणं, ट्रिपल सीट यासारख्या वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या व्यक्तींना वकिलांनी आणि कर्मचाऱ्यांनी गुलाबाचं फूल देऊन वाहतुकीचे नियम समजावून सांगितलं. यावेळी पालघर न्यायालयातले वकील, कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आदी सहभागी झाले होते.