काँग्रेस नेता राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेता राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने  आज पुन्हा  बहाल केलं. मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीसाठी दोषी ठरवून सुरतच्या न्यायालयाने २ वर्ष कारावासाची शिक्षा दिल्यामुळे राहुल गांधी लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरले होते.  केरळ च्या वायनाड लोकसभा मतदार संघाचं ते प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस आणि इंडीया आघाडी च्या घटक पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. खासदारकी बहाल झाल्यावर गांधी यांनी संसदेच्या आवारात जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.