करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे. गर्दीचे दिवस वगळता गाभाऱ्यातून दर्शनाची सुविधा पूर्ववत करत असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात सांगितलं. ते आज  अंबाबाई मंदिर परिसरातील विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. 

अंबाबाई मंदिर परिसराचा कायापालट केला जाणार असून, या परिसराला गतवैभव प्राप्त करून दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि शाहू मिल आंतरराष्ट्रीय स्मारक आराखड्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर लवकरच सादरीकरण करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.