काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी - अनुराग सिंग ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे.  काँग्रेसशी संबंधित वृत्तसंस्थेला तसंच  राजीव गांधी फाऊंडेशनला चीनमधून निधी पुरवण्यात येत असल्याबद्दल  राहुल गांधीनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं ते  संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.