दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या अर्ज भरून परीक्षेस बसण्याची सुविधा मंडळाकडून उपलब्ध

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या अर्ज भरून परीक्षेस बसण्याची सुविधा मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मंडळाने जाहीर केलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या तारखेनुसार इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून नाव नोंदणी करून आणि ऑनलाइन शुल्क भरता येणार आहे, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी म्हणजेच 14 ऑगस्टपासून अर्ज भरून ऑनलाइन शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. दहावी आणि बारावीच्या या अर्जांची 11 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. यासाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनंच भरता येणार असल्याचेही मंडळांने कळवले आहे.