पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुरस्कार

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २ पुरस्कार मिळाले आहेत. पिंपरी चिंचवडला स्मार्ट सारथी अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूरला पश्चिम क्षेत्रासाठी स्मार्ट सिटी पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार इंदूर, सुरत आणि आग्रा या शहरांना मिळाला आहे. मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांना राज्य पुरस्कार मिळाला असून चंडीगड़ला केंद्र शासित प्रदेशांचा पुरस्कार मिळाला आहे. विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी इंदूर इथे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 

पुरस्कारांच्या पाच श्रेणींमध्ये एकूण ८४५ अर्जांपैकी ६६ अंतिम विजेते आहेत. यामध्ये ३५ प्रकल्प पुरस्कार, ६ इनोव्हेशन पुरस्कार, १३ राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार, ५ राज्य आणि केंद्रशासित पुरस्कार आणि ७ सर्वोत्कृष्ट भागीदार पुरस्कार विजेते आहेत.