यंदा सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रं दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वर्ष 2023-24 या वर्षात सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रे दाखल केली गेली आहेत. यामध्ये विवरणपत्रं पहिल्यांदाच दाखल करणाऱ्यांची संख्या 53 लाखांहून जास्त आहे.  विवरणपत्रं दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 जुलैला 64 लाखांहून जास्त विवरणपत्र दांखल केली गेली. गेल्यावर्षी एकूण  5 कोटी 83 लाख विवरणपत्रं दाखल झाली होती, कालपर्यंत दाखल केल्या गेलेल्या विवरणपत्रांची संख्या याहून 16 टक्क्यांनी जास्त आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ही माहिती दिली .