महाज्योतीमार्फत परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीकरीता ३० जुलै पर्यंत मुदतवाढ

 

पुणे : जेईई, नीट, एमएचटी-सीईटी- २०२५ पूर्व प्रशिक्षणासाठी नव्याने अर्ज करण्याकरीता तसेच ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याबाबत तसेच आदी कागदपत्रे अपलोड करण्याकरीता विद्यार्थ्यांना ३० जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी दिली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून जेईई,नीट,एमएचटी-सीईटी- २०२५ या परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्याकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड मध्ये उपलब्ध अप्लिकेशन ट्रेनिंग या मोडवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. टपालाद्वारे, प्रत्यक्ष किंवा मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही प्रकल्प व्यवस्थापकांनी कळविले आहे.