सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं जप्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महसूल गुप्तचर संचालनालयानं अंदाजे २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तीन प्रवाशांकडून जप्त केलं. हे प्रवासी शारजाहून आले होते.  यासंदर्भात आत्तापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या प्रवाशांच्या  सामानातून पाच काळ्या पट्ट्यांमध्ये लपवलेल्या पाकिटांमधुन पेस्ट स्वरूपात ४३ किलो ५ ग्रॅम सोनं सापडलं. अधिक तपासानंतर पेस्ट स्वरूपात आणखी ४ किलो ६७ ग्रॅम सोनं स्वच्छतागृहातून जप्त करण्यात आलं, सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय डीआरआयने व्यक्त केला असून  पुढील तपास सुरू आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image