डिजिटल इंडिया सप्ताह २५ जुलैपासून नागरिकांना मिळणार केंद्रीय योजनांची माहिती

 

पुणे : भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलै दरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह साजरा करण्यात येणार असून र्व नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिक वापर व्हावा यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी नोंदणी केल्यास नागरिकांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता येईल.

भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील काम जगासमोर आणणे, टेक स्टार्टअप साठी सहयोग व व्यवसायाच्या नवीन संधी शोधणे, नवीन पिढीला प्रेरणा देणे, नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांची माहिती देणे आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे यासाठी या सप्ताहाचे आयोजन होत आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी http://www.nic.in/diw2023-reg ह्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

माहिती तंत्रज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांनाही या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान विषयांवरील व्याख्याने व चर्चा यामध्ये सहभागी होण्याची विनामूल्य संधी याद्वारे उपलब्ध होईल. अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करून ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांनी  केले आहे.

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image